पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ
पेट्रोल - डिझेलच्या किंमतीत वाढ घोषित करण्यात आलीय. आज मध्यरात्रीपासून हे नवीन दर लागू होतील.
मुंबई : पेट्रोल - डिझेलच्या किंमतीत वाढ घोषित करण्यात आलीय. आज मध्यरात्रीपासून हे नवीन दर लागू होतील.
पेट्रोलच्या किंमतीत १.३९ प्रती लिटर वाढ करण्यात आलीय. त्यामुळे, मुंबईमध्ये पेट्रोलसाठी आता ७४.०२ रुपये प्रती मोजावे लागतील तर दिल्लीमध्ये ६७.०४ रुपये प्रती लिटरमागे खर्च करावे लागतील.
डिझेलच्या किंमतीत १.०४ रुपये प्रती लिटर वाढ झालीय. त्यामुळे मुंबईमध्ये आता डिझेलसाठी ६२.०३ रुपये प्रति लिटर तर दिल्लीमध्ये डिझेलसाठी ५५.८१ रुपेय प्रती लिटर मोजावे लागतील.