नवी दिल्ली : नोटबंदी संबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत त्यांना आणखी थोडा वेळ देण्याचं आवाहन, राज्यसभा खासदार डॉक्टर सुभाष चंद्रा यांनी केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशाच्या हिताशी निगडीत अत्यंत महत्त्वाची पावलं पंतप्रधानांनी उचलली असल्याचं सांगत, डॉक्टर सुभाष चंद्रा यांनी यावेळी विरोधकांर निशाणा साधला. 



दरम्यान, देशाचे जवान सात-सात दिवस उपाशी राहून सीमांचं रक्षण करतात तर आपण देशासाठी थो़डा त्रास घेऊ शकत नाही का असा सवाल योगगुरु बाबा रामदेव यांनी उपस्थित केला आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 500 आणि हजारच्या जुन्या नोटांवरील बंदीचं योगगुरुंनी स्वागत केलंय. या निर्णयामुळे देशातल्या जनतेला त्रास होत असला तरी सरकारकडून त्याबाबत पाऊलं उचलण्यात येत असल्याचं बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.


चिंता करु नका.. संयम राखा


बँकांमध्ये नोटा बदलून घेण्यासाठी आणि एटीएममधून पैसे काढण्यासाठी ठिकठिकाणी  गर्दी झाली आहे. या पार्श्वभूमीवर लोकांनी संयम राखावा, असं आवाहन रिझर्व्ह बँकेनं जनतेला केलंय.. कमी मूल्याच्या पुरेशा नोटा बँकांमध्ये आहेत त्यामुळे चिंता करु नका.. संयम राखा आणि बँकांतून रक्कम काढून घरात ठेवू नका असं आवाहन आरबीआयनं जनतेला केलंय.. पाहूयात आरबीआयनं आपल्या संकेतस्थळावरुन जनतेला काय आवाहन केले आहे.