पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ल्याचा कट, ‘अल कायदा’चे तिघे अटकेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचल्याप्रकरणी ‘अल कायदा’च्या तिघा संशयितांना राष्ट्रीय तपास यंत्रणेनेने अटक केली आहे. त्यामुळे मोदी दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याचे पुढे आले आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचल्याप्रकरणी ‘अल कायदा’च्या तिघा संशयितांना राष्ट्रीय तपास यंत्रणेनेने अटक केली आहे. त्यामुळे मोदी दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याचे पुढे आले आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेना अर्थात एनआयएने सोमवारी मदुराई शहरात अनेक ठिकाणी धाड टाकली. पंतप्रधान मोदी यांच्यासह देशातील २२ प्रमुख राजकीय नेत्यांवर हल्ला करण्याचा कट ‘अल कायदा’ या दहशतवादी संघटनेकडून रचल्याच्या आरोप आहे. या संघटनेची तीन संशयित हस्तकांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
‘अल कायदा’चा एम. करीम याला शहराच्या उस्माननगर भागातून तर आसीफ सुलतान मोहम्मद याला जी. आर. नगरमधून आणि अब्बास अली यास इस्माईलपूरम येथून अटक करण्यात आली. दरम्यान, पोलीस हकीम आणि दाऊद सुलेमान या त्यांच्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.
‘अल-कायदा’चे हस्तक दक्षिण तमिळनाडू आणि मदुराईच्या परिसरात वास्तव्य करीत आहेत. तेथून ते दहशतवादी कारवायांची सूत्र हलवित असल्याचीबाब मिळाल्यानंतर ‘एनआयए’ने धाडसत्र टाकले.
दरम्यान, देशातील विविध वकिलातींना धमक्यांचे फोन केल्याचे तसेच गेल्या काही महिन्यांत विविध शहरांतील न्यायालयांमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांमध्येही त्यांचा हात असल्याचा दाट संशय आहे.