मुंबई : संपूर्ण देशभर भ्रमंतीचं स्वप्न उराशी घेऊन 'हार्ले डेव्हिडसन' बाईकवरून प्रवास करणाऱ्या प्रसिद्ध लेडी बायकर वीनू पालीवाल हिचा एका अपघातात मृत्यू झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

४० वर्षांची वीनू २४ मार्च रोजी भारतभ्रमंतीवर निघाली होती. वीनूसोबत दिपेश हा तिचा साथीदारही भारतभ्रमंतीसाठी निघालेला होता. हे दोघंही हार्ले डेव्हिडसन बाईकवरून प्रवास करत होते.


वीनू पालीवाल

सोमवारी, मध्यप्रदेशात ग्यारसपूरनजिक एका वळणावर वीनूचा बाईकवरील ताबा सुटला आणि वेगात असलेली तिचा बाईक रस्त्यावरून घसरत गेली... यात वीनूही फरफटत गेली. तिला जिल्हा हॉस्पीटलमध्ये नेण्यात आलं... परंतु, वेळ निघून गेली होती. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. 


'लेडी ऑफ द हार्ले २०१६' होती वीनू


गेल्याच वर्षी हार्ले डेव्हिडसन ४८ मॉडेलसोबत वीनूनं हॉग रॅली पूर्ण केली होती. तिची 'लेडी ऑफ द हार्ले २०१६' म्हणून निवडही करण्यात आली होती. १८० च्या स्पीडवर वीनू चांगल्या पद्धतीनं बाईक चालवू शकत होती. त्यामुळेच तिला हा खिताब देण्यात आला होता.