बालतिस्तान : पाकव्याप्त काश्मीरमधल्या बालतिस्तानमध्ये पाकिस्तान लष्कराच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या आहेत. बालतिस्तान-गिलगिटमधले शेकडो लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी पाकिस्तान लष्कराच्या विरोधात घोषणाबाजी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गिलगिटच्या भूमीवरुन पाकिस्तान लष्करानं निघून जावं, अशी मागणी करणा-या पाचशे तरुणांना पाकिस्तानी आर्मीनं तुरुंगात टाकलं आहे. त्याविरोधात स्थानिकांमध्ये रोष आहे. याच रोषाचा आज सकाळी उद्रेक झाला आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानविरोधात घोषणा देण्यात आल्या. 


भारतानं यामध्ये हस्तक्षेप करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग असल्याचं पंतप्रधान मोदींनी ठणकावून सांगितल्यानंतर लगेचच दुस-या दिवशी हा प्रकार घडला. गिलगिट - बालतिस्तान हा जम्मू काश्मीरचाच एक भाग असून 1948 च्या युद्धानंतर त्यातला काही भाग पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेला.