चेन्नई : तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या मृत्यूबाबत पक्षातूनच शंका उत्पन्न करण्यात आली आहे. विधानसभेचे सभापती राहिलेले AIADMKचे ज्येष्ठ नेते पी.एच. पंडियन यांनी जयललितांचा मृत्यू संशयास्पद असल्याचं म्हटलंय. त्यांनी शशिकला यांचं थेट नाव घेणं टाळलं असलं तरी त्यांच्याकडेच अंगुलीनिर्देश केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

22 सप्टेंबरला अम्मांना रुग्णालयात दाखल केलं, त्यावेळी त्यांच्या घरात वादावादी झाली होती आणि त्यात जयललितांना कुणीतरी धक्का मारला होता, असा सनसनाटी आरोप कुरियन पंडियन यांनी केलाय. चेन्नईमध्ये आज आपला मुलगा मनोज याच्यासह घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शशिकलांना लक्ष्य केलं.