नवी दिल्ली :  दिल्लीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमोर स्टेडियममध्ये काही प्रेक्षकांनी मोदी-मोदी घोषणाबाजी केली, भारताच्या विजेंदरसिंगची व्यावसायिक बॉक्‍सिंग लढत पाहण्यासाठी राहुल गांधी गेले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजेंदरचा हा सामना पाहण्यासाठी राहुल गांधी उपस्थित होते. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे नेते राजीव शुक्लाही हजर होते.


ही लढत पाहण्यासाठी मेरी कोमसह कुस्तीपटू योगेश्वर दत्त, क्रिकेटपटू युवराजसिंग, वीरेंद्र सेहवाग, सुरेश रैना व अभिनेता रणदीप हुड्डा उपस्थित होते.


राहुल गांधींसमोरच प्रेक्षकांनी मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या. प्रेक्षकांच्या या वर्तनावर राहुल गांधी यांनी कोणतीही प्रतिक्रिया न व्यक्त करता हसत स्टेडियमबाहेर पडले. 


भारताच्या विजेंदरसिंगने व्यावसायिक बॉक्‍सिंग लढतीत कारकिर्दीमधील सर्वोत्तम कामगिरी करताना सुपर मिडलवेट गटातील 'आशियाई किताब'  पटकावला.