मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवनार साफ करुन दाखवावे, असे आव्हान काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई दौऱ्यावर आलेल्या राहुल गांधी यांनी देवनार डंपिंग ग्राउंडला भेट दिली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मोदींच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या स्वच्छ भारत अभियानावर टीका केली. 


देवनार डंपिंग ग्राउंड हे अनेक नागरिकांच्या समस्यांचे मूळ कारण होत चालले आहे.  देवनार डंपिंग ग्राउंडला लागलेल्या आगीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. याठिकाणी सतत आग लागण्याच्या घटना घडत आहे.


राहुल गांधी म्हणाले की,  देवनार डंपिंग ग्राउंडसारख्या ठिकाणी कोणत्याही उपाययोजना होत नसल्याचे दिसत आहे. मोदींच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये अनेक उणीवा आहेत. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे फक्त स्वच्छ भारत अभियानाबद्दल घोषणा देत आहेत. पण, फक्त घोषणा देऊन काही होत नाही, या अभियानात अनेक उणीवा आहेत. स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर मुंबईसारख्या शहरात कचरा प्रश्न भीषण आहे.