नवी दिल्ली : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचं अधिकृत ट्विटर हँडल पुन्हा एकदा हॅक करण्यात आलं आहे. या ट्विटर हँडलवरून आक्षेपार्ह ट्विटस करण्यात आली आहेत. काँग्रेसची वेबसाईट आम्ही हॅक केली आहे, तसंच काँग्रेसबाबतचे मेलही बाहेर काढणार असल्याचा गौप्यस्फोटही ट्विटर हँडलवरून करण्यात आला आहे.


याआधी म्हणजे कालच राहुल गांधींचं ट्विटर हँडल हॅक करण्यात आलं होतं. त्यांच्या ट्वीटर अकाऊंट हॅण्डलचं नाव देखील बदलण्यात आलं होतं. रिटारर्डेड गांधी असं त्यांना म्हटलं होतं. काल हॅक करण्यात आलेल्या प्रकरणी काँग्रेसनं दिल्लीतल्या सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे.