आसाम: फक्त एका कुटुंबामुळे संसदेचं कामकाज होत नसल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि गांधी कुटुंबावर हल्ला चढवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संसदेचं कामकाज बंद पाडून काँग्रेस 2014 लोकसभा निवडणुकांचा बदला घेत आहे, असा आरोप नरेंद्र मोदींनी केला आहे. काँग्रेसमुळेच गरिबांसाठी असलेली विधेयक पास होत नसल्याचंही मोदी म्हणालेत. 


आसाममध्ये निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी चहाच्या मळ्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांसमोर भाषण केलं, तेव्हा काँग्रेसवर हा घणाघात केला. 


दरम्यान पंतप्रधानांनी केलेल्या टीकेला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनीही प्रत्युत्तर दिलं आहे. फक्त तीन ते चार व्यावसायिकांसाठी हे सरकार चालत असेल तर ते आम्ही चालू देणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले आहेत. तसंच पंतप्रधानांचं काम हे देश चालवणं आहे, कारणं देणं नाही, असा टोलाही राहुल गांधींनी लगावला आहे.