अलीगड : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या उत्तर प्रदेशमध्ये किसान यात्रा करत आहेत. याचाच भाग म्हणून अलीगडमध्ये त्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. पण या सभेला फक्त 150 च्या जवळपास नागरिक उपस्थित होते. यामुळे भडकलेले राहुल गांधी त्यांची नियोजीत सभा न घेताच निघून गेले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयोजकांनी राहुल गांधींना सभा घ्यायची विनंती केली पण राहुल गांधींनी मात्र त्यांचं ऐकलं नाही. राहुल गांधींच्या या निर्णयामुळे स्थानिक काँग्रेस नेते मात्र नाराज झाल्याचं बोललं जात आहे.