नवी दिल्ली : ओआरओपीच्या मुद्द्यावरून माजी सैनिक रामकिशन ग्रेवाल यांनी आत्महत्या केली. ग्रेवाल यांच्या आत्महत्येनंतर दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्रेवाल यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ काँग्रेसनं मेणबत्ती मोर्चाचं आयोजन केलं होतं. या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दोन तासानंतर दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींना सोडून दिलं. दरम्यान मोदी सरकारनं मृत सैनिकाच्या कुटुंबियांची माफी मागायला हवी अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली आहे.