ऋषिकेश : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर पुन्हा एकदा तोफ डागलीये. स्वातंत्र्यानंतर 52 वर्षं संघाच्या नागपूर मुख्यालयात तिरंगा फडकला नसल्याचं ते म्हणाले. रामलिलेमध्ये राम मोदींचा मुखवटा घालून येतील असा टोलाही त्यांनी लगावला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणुकीच्या तोंडावर उत्तराखंडमध्ये हृषिकेश इथं काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना गांधी बोलत होते. मोदी एकीकडे चरख्यासोबत फोटो काढतात आणि 50 उद्योगपतींच्या भल्यासाठी काम करतात, अशी टीकाही त्यांनी केली.