राहुल गांधी संसदेतली कोंडी फोडणार?
संसदेच्या अधिवेशनात नोटबंदीवरून आज कोंडी फुटण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : संसदेच्या अधिवेशनात नोटबंदीवरून आज कोंडी फुटण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आज लोकसभेत नोटबंदीवरून आपले मत मांडणार आहेत. मतदानावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली होती. परंतु सरकारने आणि लोकसभा अध्यक्षांनी ही मागणी मान्य केली नसल्यामुळे संसदेचे कामकाज होऊ शकले नाही.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात उपस्थित राहावं, यावर विरोधक ठाम आहेत. त्यामुळे राहुल गांधी काय बोलतात याकडे लक्ष लागले आहे.