नवी दिल्ली : एकीकडे नोटाबंदीनंतर रोख रकमेच्या टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असताना देशातील विविध भागात टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये कोट्यावधींची रोकड हस्तगत करण्यात आलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं केलेल्या कारवाईत 13.65 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आलीये. धक्कादायक बाब म्हणजे जप्त करण्यात आलेल्या रकमेमध्ये तब्बल 2 कोटी 60 लाख रुपयांच्या नव्या नोटांचा समावेस आहे. 


एका कपाटात ही रक्कम लपवून ठेवण्यात आली होती. ग्रेटर कैलाश परिसरातील एका लॉ फर्मवर टाकलेल्या छाप्यात ही रक्कम हस्तगत करण्यात आलीये. कर्नाटक आणि तामिळनाडूत केलेल्या कारवाईतही मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त करण्यात आली होती.