नवी दिल्ली : रेल्वे मंत्री सुरेश प्रभू आज आपला दुसरा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करणार आहेत. सातत्यानं तोट्यात जाणाऱ्या रेल्वेची आर्थिक गाडी पुन्हा एकदा रुळावर आणण्याचं मोठं आव्हानं आहे. जनतेच्या अपेक्षा आणि आर्थिक कोंडीची समस्या बघता प्रभूंच्या अर्थसंकल्पाकडून फारशा अपेक्षा ठेवणंच अतियशोक्ती ठरेल. तरी सुद्धा स्वच्छता, सुरक्षा, आणि रेल्वे सेवा वेळेवर चालवणं या तीन प्रमुख अपेक्षा संपूर्ण देशातून व्यक्त होत आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पश्चिम बंगाल, पंजाब, आणि तामिळनाडू राज्यात होणाऱ्या निवडणूका बघता या राज्यांवर प्रभूंची विशेष कृपा होण्याची शक्यताय. शिवाय यंदाही प्रवासी भाड्यात दरवाढ होणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिलीय. 


याव्यतिरिक्त विविध प्रलंबित रेल्वे प्रकल्पांसाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून स्पेशल परपज व्हेईकल तयार करून पतपुरवठा उभा करण्याचा नवा उपक्रम सुरू होईल असंही बोललं जातय. नव्या प्रीमियम ट्रेन, बार कोडची तिकिटं सगळ्या बड्या स्थानकांवर इ केटरिंग अशा अनेक नव्या सुविधाही यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर होतील अशी अपेक्षा आहे.