रेल्वे बजेट आज संसदेत मांडलं जाणार
केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आज रेल्वेचा अर्थसंकल्प सादर कऱणार आहेत. सुरेश प्रभू यांच्याकडून महाराष्ट्राला यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पामधून मोठ्या अपेक्षा आहेत.
नवी दिल्ली : केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आज रेल्वेचा अर्थसंकल्प सादर कऱणार आहेत. सुरेश प्रभू यांच्याकडून महाराष्ट्राला यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पामधून मोठ्या अपेक्षा आहेत.
त्यामुळे प्रभू यांच्या पेटा-यातून लोकल, मेट्रो, तसंच लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या प्रवाशांकरता नेमकं काय मिळणार याबाबत उत्सुकता आहे.
या अर्थसंकल्पात उत्तर महाराष्ट्रावर प्रभूंची कृपादृष्टी राहावी यासाठी रेल परिषद या एनजीओनं विविध मागण्यांसह 16 प्रस्ताव असणारी पुस्तिका रेल्वेमंत्री, पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांना पाठवली आहे.
तसेच मधू दंडवतेनंतर प्रथमच कोकणला रेल्वे मंत्री पद मिळालंय. त्यामुळे साहजिकच कोकणवासियांच्या अपेक्षा वाढल्यात. त्यामुळे कोकणसाठी प्रभूंच्या पेटाऱ्यात काय दडलंय हे रेल्वे संकल्प सादर झाल्यावरच कळेल.