रेल्वेत शौचालयाच्या दुर्गंधीपासून मिळणार मुक्ती
रेल्वेतून प्रवास करताना चुकून तुम्हाला मिळालेली सीट `शौचालया`जवळ असेल तर तुम्हाला आत्तापर्यंत याचा संपूर्ण प्रवासभर त्रास सहन करावा लागला असेल ना... पण आता मात्र असं होणार नाही.
नवी दिल्ली : रेल्वेतून प्रवास करताना चुकून तुम्हाला मिळालेली सीट 'शौचालया'जवळ असेल तर तुम्हाला आत्तापर्यंत याचा संपूर्ण प्रवासभर त्रास सहन करावा लागला असेल ना... पण आता मात्र असं होणार नाही.
होय, कारण भारतीय रेल्वे आता दुर्गंधविरहीत शौचालय ट्रेनमध्ये बसवणार आहे... या शौचालयांचं वैशिष्ट्य म्हणजे, यामधून रेल्वेभर दुर्गंधी पसरणार नाही. तसंच साफ-सफाईसाठी पाणीही जास्त वापरावं लागणार नाही.
हे शौचालय बसवण्यासाठी रेल्वेनं कंत्राटं मागवलेत. आत्तापर्यंत आरडीएसओकडे ६७७ प्रपोजल आलेत, यातील १० प्रपोजल निवडण्यात आलेत. सगळ्या योजनांचं प्रेझेंटेशन झाल्यानंतर रेल्वेनं कोईम्बतूरच्या इंजिनिअर्सच्या एका ग्रुपची पहिला क्रमांकाचा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलाय.