लखनऊ : उंदराच्या जाचापासून सुटका करण्यासाठी उत्तरप्रदेशच्या ब्रिटीशकालीन चारबाग रेल्वे प्रशासनानं अनोखी शक्कल लढवली आहे. रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरच्या उंदरांना संपवण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट किलरची नियुक्ती करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उंदरांमुळे रेल्वेची संपत्ती, सरकारी फाईल्स आणि प्रवाशांच्या सामानाचं नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी 4.76 लाख रुपयांचं कंत्राट देण्यात आलं आहे. एका वर्षासाठीचं हे कंत्राट आहे. या महिन्याच्या अखेरीस उंदीर मारण्याच्या या कामाला सुरुवात होणार आहे.