लखनऊ :  उत्तरप्रदेशात दारूण पराभव झाल्यानंतर मावळते मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया देताना उपरोधक टोला मारला आहे. मी राज्यात एक्स्प्रेस हायवे आणला. पण राज्यातील जनतेला बुलेट ट्रेन पाहिजे होती, त्यामुळे त्यांनी नव्या सरकारला निवडून दिले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



राज ठाकरे आणि अखिलेश यादव यांच्या साम्य


राज ठाकरे आणि अखिलेश यादव यांनी विकास करूनही त्यांना जनतेने नाकारले आणि भाजपला बहूमत मिळून दिले. त्यामुळे दोघांनी विकास करूनही मते मिळत नाही याबद्दल खंत व्यक्त केली होती. 


आज निवडणूक निकालानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अखिलेश यादव म्हणाले,  समाजवादी पक्षाने जो विकास केला त्यापेक्षा अधिक विकास येणारे सरकार करणार आहे.  शेतकऱ्यांचे कर्ज एक झटक्यात फिटणार आहे. मी राज्यातील जनतेला  एक्स्प्रेस  हायवे दिला पण त्यांना बुलेट ट्रेन पाहिजे आहेत. त्यामुळे हे सरकार खूप सारा विकास करेल असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.