जयपूर : राजस्थानच्या मुख्यमंत्री यांनी अन्नपूर्णा रसोई योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेसाठी स्वायत्त शासनाकडून चार गाड्या बांसवाडा परिषदेला उपलब्ध करुन दिले जातील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयुक्त पी के भापोर यांनी म्हटलं की, बुधवारी सकाळी ९ वाजता जुन्या बस स्टॅण्डजवळ या योजनेचा शुभारंभ राज्यमंत्री धनसिंह रावत आणि सभापती मंजूबाला पुरोहित यांच्या उपस्थितीत होणार आहे. येथे रोज सकाळी ५ रुपयात नाश्ता आणि आठ रुपयात पौष्टिक भोजन दुपारी आणि रात्री उपलब्ध करुन दिलं जाणार आहे.


नाश्त्यामध्ये पोहे, मसाला उपमा, सेवळ्या, इडली-सांभर, लापसी, खिचडी, बाजरीची खिचडी, गहूची खिचडी तर भोजनात दाळ-भात, पुलाव, कडी भात, मसाला खिचडी असे अनेक पदार्थ असणार आहेत. नाश्ता रोज सकाळी आठ ते साडे दहा आणि जेवन 11 ते अडीज वाजेपर्यंत तर संध्याकाळी सात से रात्री साडे नऊ वाजेपर्यंत मिळणार आहे.