दलितांच्या मतांमुळे भाजपला मिळालं महायश - रामदास आठवले
उत्तर प्रदेशात भाजपने पहिल्यांदा ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयानंतर तर विरोधकांना ही चांगलाच धक्का बसला. विरोधकांनीही पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केलं. ही मोदी लाट असल्याचं अनेक विरोधकांनी मान्य ही केलं. यावर आता आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. दलित मतदारांनी बहुजन समाज पक्षाला नाकारले. समाजवादी पक्ष, काँग्रेसचाही दारुण पराभव झाला. दलित मतदारांची मते भाजपला मिळाल्याने यश नव्हे तर महायश मिळाले अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दिली.
मुंबई : उत्तर प्रदेशात भाजपने पहिल्यांदा ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयानंतर तर विरोधकांना ही चांगलाच धक्का बसला. विरोधकांनीही पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केलं. ही मोदी लाट असल्याचं अनेक विरोधकांनी मान्य ही केलं. यावर आता आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. दलित मतदारांनी बहुजन समाज पक्षाला नाकारले. समाजवादी पक्ष, काँग्रेसचाही दारुण पराभव झाला. दलित मतदारांची मते भाजपला मिळाल्याने यश नव्हे तर महायश मिळाले अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दिली.
उत्तर प्रदेशातील मतदारांचे रामदान आठवले यांनी आभार मानले. रिपब्लिकन पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये भाजपला जाहीर पाठिंबा दिला होता. उत्तर प्रदेशात भाजपला यश मिळाल्याचे घोषित झाल्यानंतर रामदास आठवलेंनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.
'उत्तर प्रदेशात दलित मतदारांचा कल महत्त्वपूर्ण असतो आणि या वेळीही दलितांचा कौल महत्त्वपूर्ण ठरला. रिपब्लिकन पक्षाने भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले आणि मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्या भीम अॅप आणि नोटाबंदीच्या धाडसी निर्णयामुळे दलित मतदारांनी भाजपवर विश्वास दाखवला. अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली.