नवी दिल्ली : उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये बलात्काराच्या व्हिडिओंची 50 ते 150 रुपयांना विक्री सुरु आहे. 30 सेकंद ते पाच मिनिटांचे हे व्हिडिओ आहेत. मुख्य म्हणजे खुलेआम या व्हिडिओची विक्री सुरु आहे. दिल्ली तसंच उत्तर प्रदेशमधलं मेरठ, आग्रा या शहरांमध्ये या व्हिडिओंची विक्री होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्रजी वृत्तपत्र टाईम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे. काही जण एका अल्पवयीन मुलीला उसाच्या शेतात जबरदस्ती घेऊन जातात आणि तिच्यावर अत्याचार करतात, असं या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे. 


हे व्हिडिओ ट्विटर आणि फेसबूकवरून डाऊनलोड करून याची विक्री करण्यात येत आहे. बलात्कार करताना मुलीला ब्लॅकमेल करण्यासाठी किंवा तिच्यावर पुन्हा अत्याचार करण्यासाठी असे व्हिडिओ बनवले जातात, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.