मुंबई : टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांनी मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारनं अत्यंत धाडसी पाऊल उचलल्याचं टाटांनी ट्वीटरवर म्हटलं आहे.


सध्या रुग्णालयात अनेकांची गैरसोय होतेय. ती टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित करायला हव्यात अशी सूचनाही टाटांनी मोदी सरकारला केली आहे.