मुंबई : उद्योदक रतन टाटा यांच्या ट्विटर अकाऊंटवरून मोदींबाबत काल करण्यात आलेल्या ट्विटमुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या, पण रतन टाटांचं ट्विटर अकाऊंट हॅक करून हा प्रकार करण्यात आल्याचं आता समोर येत आहे. खुद्द रतन टाटांनीच याबाबत कबुली दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माझं ट्विटर अकाऊंट हॅक झाल्यानं मला धक्का बसला होता. आता माझं ट्विटर अकाऊंट पुन्हा व्यवस्थित झालं आहे. घडलेल्या प्रकारामुळे झालेल्या त्रासाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. ते ट्विट आता डिलीट करण्यात आलं आहे, असं ट्विट रतन टाटांनी केलं आहे. 



मुकेश अंबानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक फोटो पॅरोडी अकाऊंट रियल हिस्ट्री पिकनं ट्विट केला होता. रिलायन्सचे मालक त्यांच्या कर्मचाऱ्याबरोबर महागाई कशी नियंत्रणात आणायची याबाबत चर्चा करतायत असं हा फोटो शेअर करताना लिहिण्यात आलं होतं. 


रतन टाटांच्या ट्विटर अकाऊंटवरून हे ट्विट शेअर करण्यात आलं होतं. एवढच नाही तर हे ट्विट शेअर करताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनाही टॅग करण्यात आलं होतं.