उंदरांनी प्यायली तब्बल ९ लाख लीटर दारु
बिहारमध्ये दारुबंदीच्या निर्णयानंतर ९ लाख लीटर दारु जप्त करण्याच आली. जप्त केलेली दारु ज्या ठिकाणी ठेवण्यात आली होती ती उंदरांनी संपवली.
पटना : बिहारमध्ये दारुबंदीच्या निर्णयानंतर ९ लाख लीटर दारु जप्त करण्याच आली. जप्त केलेली दारु ज्या ठिकाणी ठेवण्यात आली होती ती उंदरांनी संपवली.
९ लाख लीटर दारु ही उंदरांनी संपवल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. बिहार पोलीस मुख्यालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
१३ महिन्याआधी ९.१५ लाख लीटर दारु ज्यामध्ये देशी आणि विदेशी दारुचा समावेश आहे ती जप्त करण्यात आली होती. पोलीस स्थानकात आणतांना देखील काही प्रमाणात या साठ्याचं नुकसान झालं तर वाचलेली बाकी दारु ही उंदरांनी संपवली अशी माहिती समोर आली आहे. पण यामध्ये आता किती सत्य आहे याची चौकशी सुरु झाली आहे.