पुष्कर : पुष्कर  शहरापासून जवळ असलेल्या 'रावतों की ढाणी' मधील पुष्करचे माजी नगरसेवकाच्या (काँग्रेस) रिसॉर्टवर बुधवारी पोलिसांनी छापेमारी केली. रिसॉर्टवर तब्बल 200 विदेशी तरुणी नशेत तर्रर्र असल्याचे आढळून आल्या. महत्त्वाचे म्हणजे, त्यातील बहुतेक तरुणी अर्धनग्नावस्थेत होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांना पाहाताच इस्रायल पर्यटक तरुणींची कमालीची धांदल उडाली. आपल्या बॅगा घेऊन तेथून पळ काढला. रिसोर्टचा मालक आणि पार्टी आयोजकही फरार आहे. पोलिसांनी डीजेचा संचालक आणि पार्टीचा सहभाग झालेल्या रेस्तराँच्या संचालकाला पोलिसांनी अटक केले आहे. रिसॉर्टमधून विदेशी दारुच्या बाटल्या आणि डीजे साउंड सिस्टिम जप्त केले आहे.


500 रुपयांत एंट्री, उपलब्ध होती मादक द्रव्ये...


- रेव्ह पार्टीसाठी आयोजकांनी प्रत्येक पर्यटकाकडून 500 रुपये एंट्री फी वसूल केली होती. 


- याशिवाय पर्यटकांना विदेशी दारु आणि मादक द्रव्ये उपलब्ध करून दिली होती. त्यासाठी वेगळे पैसे आकारण्यात आले होते. 


- पोलिसांना विविध प्रकारे मादक पदार्थ आढळून आले आहे. रिसॉर्ट सील करण्यात आले आहे. 


नशेत तर्रर्र आणि अर्धनग्नावस्थेत होत्या तरुणी...


- रिसॉर्टवर छापेमारीत पोलिसांना शेकडो इस्रायली महिला-पुरुष पर्यटक अर्धनग्नावस्थेत आढळून आल्या. 


- डीजेच्या गाण्यावर बहुतांश पर्यटक तरुणींच्या गळ्यात हात टाकून अश्लील डान्स करत होते.


- सर्वत्र विदेशी दारुच्या बाटल्या आणि मादक द्रव्याचे रॅपर पडले होते.


बुधवारी दुपारपासून सुरु होती पार्टी...


- बुधवारी दुपारी रेव्ह पार्टी सुरु झाली होती. पुष्कर पोलिसांनी सायंकाळी 7 वाजता सापळा रचून रिसॉर्टवर छापेमारी केली. 


- माजी नगराध्यक्ष बाबूलाल दग्दी यांनी सांगितले की, रिसोर्ट मागील 3 वर्षांपासून देवडा येथील जगदीश उबाना यांना चालवण्यासाठी दिले होते.