मुंबई : दहा रुपयांच्या वेगवेगळ्या नाण्यांवरून काही काळ नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. पण या सगळ्या चर्चांवर आरबीआयनं स्पष्टीकरण दिलं आहे. १० रुपयांची सगळी नाणी चलनामध्ये आहेत. ही सगळी नाणी वेगवेगळ्या वेळी चलनात आल्यामुळे त्यांच्यावरचं डिझाईन वेगळी असल्याचं आरबीआयनं सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेरावालीचा फोटो, संसदेचा फोटो, नाण्याच्या मध्यभागी असलेला १० रुपयांची निशाणी, होमी भाभांचा फोटो, महात्मा गांधींचा फोटो यांच्यासहीत सगळी नाणी ही चलनातली असल्याची प्रतिक्रिया आरबीआयकडून देण्यात आली आहे.