मुंबई: येत्या काही दिवसांमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांना खास डिझायनर यूनिफॉर्म मिळणार आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फॅशन डिझायनर रितु बेरी रेल्वे कर्मचाऱ्यांचा यूनिफॉर्म डिझाईन करणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रितु बेरी स्टेशन मास्तर, लोको पायलट, टीटी आणि गार्ड आणि अन्य कर्मचाऱ्यांचा यूनिफॉर्म डिझाईन करणार आहेत. तसंच रितू बेरी एक असा यूनिफॉर्म डिझाईन करणार आहेत, जो सगळे कर्मचारी फक्त रेल्वे दिनाच्या दिवशीच घालतील. रितु बेरी या कामाचं कोणतंही शुल्क घेणार नाहीत.