आंतरजातीय विवाहाबद्दल मोहन भागवत म्हणतात...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी देशात आंतरजातीय विवाहाचं समर्थन केलंय.
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी देशात आंतरजातीय विवाहाचं समर्थन केलंय.
'ऑर्गेनायजर'ला दिलेल्या मुलाखतीत भागवतांनी ही भूमिका घेतलीय. संघाच्या स्वयंसेवकांनी सुधारणावादी पाऊल उचलण्याचं आवाहन त्यांनी यातून केलंय.
हिंदूंमध्ये आंतरजातीय विवाह आजही स्वीकारले जात नाहीत. यावरच जोर देताना स्वयंसेवकांनी अशी सुधारणावादी पावलं उचलणं गरजेचं असल्याचं भागवतांनी म्हटलंय. सर्व्हे केला तर इतरांपेक्षा आंतरजातीय विवाह करणाऱ्या संघाच्या स्वयंसेवकांची संख्या जास्त असेल असाही दावा त्यांनी केलाय.