नोटबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी २० नोव्हेंबरला करणार शुभारंभ


नवी दिल्ली :   २०२२ वर्षांपर्यंत सर्वांसाठी घर देण्याचे उद्दिष्ठ पूर्ण करण्यासाठी पुढील तीन वर्षात एक कोटी घरे बनविण्याची योजनाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २० नोव्हेंबर रोजी आग्रा येथे करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय ग्राम विकास मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले की पंतप्रधान मोदी २० नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशाताली आग्रा येथे योजनेचा उद्घाटन करणार आहेत. यापूर्वीच्या इंदिरा आवास योजननेला बदलून पंतप्रधान आवास योजनेत ग्रामीण भागात पुनर्गठीत करण्याची मंजुरी आहे. 


या योजनेसाठी मैदानी क्षेत्रात १ लाख २० हजार रुपये आणि डोंगराळ भागात १.३० हजार रुपये मदत निधी देण्यात येणार आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात ३३ लाख घरं बांधण्याचे उद्दिष्ठ आहे.