जोधपूर : 'चिंकारांची शिकार सलमाननेच केली', असं चालकाने म्हटले आहे, तो सलमान खानविरोधातील एकमेव साक्षीदार आहे. मात्र त्याचा हा चालक खटल्यादरम्यान प्रदीर्घ काळ गायब होता, मात्र आता त्याने सलमानच्या निर्दोष मुक्ततेला आव्हान दिले असल्याचं सांगण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थान उच्च न्यायालयाने नुकतेच या खटल्यात सलमानला निर्दोष ठरवून त्याची मुक्तता केली. हरीश दुलानी या एकमेव साक्षीदाराच्या जबाबावर हा खटला उभा राहिला होता. सलमानच्या सोबत दुलानी हा त्याचा चालक होता.   हरणाची कथित शिकार  १९९८ मध्ये झाली तेव्हा तो ड्रायव्हर होता. 


सलमाननेच चिंकारा हरणांची शिकार केली होती. या जबाबावर मी अद्याप ठाम आहे, न्यायालयाने पुन्हा समन्स बजावल्यास मी हाच जबाब न्यायालयात देईन असे दुलानीने म्हटलं आहे.


दुलानी याने यापूर्वी या खटल्यातील अनेक समन्स दुर्लक्षित करून खटल्याच्या सुनावणीला अनुपस्थित राहिला. सरकारी वकिलांचा साक्षीदार बनल्याने या खटल्यापासून दूर राहण्यासाठी आपल्याला धमक्या येत होत्या असं दुलानीने म्हटलं आहे. दुलानीने  ऑक्टोबर १९९८ मध्ये न्यायाधीशांसमोर कबुली दिली होती की, सलमाननेच चिंकाराची शिकार केली.