नवी दिल्ली : जम्मू कश्मीरमधील उरी हल्ल्यात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले बिहारचे जवान सुनील कुमार यांना तीन मुली आहेत. वडिलांप्रमाणे त्यांच्यातही तितकाच साहस आणि हिमंत दिसली. आपले पिता शहीद झाल्याचं कळल्यानंतरही या मुलींनी परीक्षा दिली. अजून या शहीद जवानाचं पार्थिव घरी पोहोचलं नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहीद सुनील कुमार यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. 14, 12 आणि  7 वर्षाच्या तीन मुली तर 2 वर्षाचा एक मुलगा आहे. पार्थिव पोहोचण्याआधी त्यांनी शाळेत जाऊन परीक्ष दिल्यानंतर त्यांना विचारण्यात आलं की, तुम्ही इतकी हिंमत कशी मिळवली. तर त्यांनी म्हटलं की, आमचे वडील आम्हाला मुलांप्रमाणे ठेवायचे. गावात शिक्षणाच्या सोयीसुविधा नसल्याने त्यांनी आम्हासा शहरात पाठवलं. वडील देशासाठी शहीद झाले. वडील आम्हाला सांगायचे की देशासाठी काहीतरी करा... त्यामुळे आम्ही परीक्षा देण्यासाठी आलो.'


अशा साहसी शहिदाच्या साहसी मुलींना देखील सलाम.