चेन्नई : सॅमसंग नोट 2 या मोबाईलला विमानात आग लागल्याची घटना घडली आहे. इंडिगोचं विमान सिंगापूरहून चेन्नईला येत असताना हा प्रकार घडला आहे. चेन्नई विमानतळावर उतरत असताना ही घटना घडली असून यात कोणताही प्रवासी जखमी झाला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओव्हरहेड बिनमध्ये हा फोन ठेवण्यात आला होता. विमान उतरत असताना ओव्हरहेड बिनमधून धूर येताना क्रूच्या लक्षात आलं. यानंतर ही आग विझवण्यात आली.


विमान प्रवासावेळी मोबाईल बंद ठेवण्याचं आवाहन डीजीसीएकडून करण्यात आलं आहे. तसंच डीजीसीएनं या प्रकारानंतर सॅमसंगच्या प्रतिनिधींना याविषयी चर्चा करण्यासाठी बोलावलं आहे. याआधी सॅमसंग गॅलेक्सी नोट 7मध्येही स्फोट होण्याच्या घटना झाल्यामुळे डीजीसीएनं हा फोन विमानात बंद ठेवायला सांगितलं होतं.