नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारामध्ये सरसंघचालक मोहन भागवतांना स्थान मिळावं, असा सल्ला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.  राष्ट्रपतीपदाचा उमेदवार सक्षम, घटनेचं ज्ञान असणारा आणि प्रखर राष्ट्रवादी असावा. मोहन भागवतांचं नाव राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत आहे. हा हिंदूराष्ट्र या संकल्पनेसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले, राष्ट्रपती सक्षम असावा, घटनेचं ज्ञान असावं आणि प्रखर राष्ट्रवादी असावा, आमच्या मतांची गरज असली तर चर्चा करायला उद्धव ठाकरे मातोश्रीवर असतात. 


चर्चेला तयार आहोत. मातोश्रीत ही उत्तम जेवण मिळतं, प्रीती भोजनाचं निमंत्रणाचं कार्ड आमच्यापर्यंत आलेलं नाही. मोहन भागवतांचं नाव राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी चर्चेत आहे. हा हिंदुराष्ट्र या संकल्पनेसाठी उत्तम पर्याय असू शकतो. मात्र याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.