शशिकलांना तुरुंगात हवाय सेवक, वेस्टर्न टॉयलेट आणि...
बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टानं सत्ताधारी एआयएडीएमकेच्या महासचिव शशिकला यांना दोषी ठरवल्यानंतर त्यांनी कोर्टासमोर शरणागती पत्करली. आता त्यांची नवी ओळख आहे... कैदी नंबर १०७११... तुरुंगात गेल्यानंतर मात्र शशिकला यांनी जेल प्रशासनाकडे तुरुंगात आपल्याला काही गोष्टी मिळाव्यात अशी मागणी केली आहे...
नवी दिल्ली : बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टानं सत्ताधारी एआयएडीएमकेच्या महासचिव शशिकला यांना दोषी ठरवल्यानंतर त्यांनी कोर्टासमोर शरणागती पत्करली. आता त्यांची नवी ओळख आहे... कैदी नंबर १०७११... तुरुंगात गेल्यानंतर मात्र शशिकला यांनी जेल प्रशासनाकडे तुरुंगात आपल्याला काही गोष्टी मिळाव्यात अशी मागणी केली आहे...
या गोष्टींची यादी बरीच मोठी आहे... यामध्ये आपल्याला तुरुंगात एक सेवक दिला जावा अशीदेखील मागणी शशिकला यांनी केलीय. उल्लेखनीय म्हणजे, कैदी नंबर १०७११ म्हणजेच शशिकला या तुरुंगात मेणबत्ती बनवण्याचं काम करणार आहेत. यासाठी त्यांना दररोज 50 रुपये रोजगारही मिळणार आहे.
शशिकला यांनी जेल प्रशासनाकडे मागितलेल्या सुविधांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे...
१. पलंग आणि टीव्ही द्यावा
२. हातात बेडया घालू नये
३. एक सेवक द्यावा
४. घरचे जेवण द्यावे
५. वेस्टर्न टॉयलेट
६. २४ तास गरम पाणी
७. २४ तास मिनरल वॉटर
८. मेडीटेशनसाठी वेगळी जागा
९. आठवड्यातून दोन वेळा मांसाहार
१०. वैद्यकीय सुविधा