मुंबई : क्रिकेटमध्ये सर्रासपणे सट्टाबाजी सुरु असते. महत्त्वाच्या स्पर्धांदरम्यान तर सट्टेबाजार तेजीत असतो. मात्र क्रिकेटनंतर आता मान्सूनवरही सट्टेबाज सट्टा लावतायत. थोडीथोडकी रक्कम नव्हे तर कोट्यावधींचा सट्टा पावसासाठी लावला जातोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मान्सूनचे केरळात आगमन झाले असून तो लवकरच मुंबईसह महाराष्ट्रात दाखल होणार आहे. या मान्सूनवर सट्टेबाजांनी तब्बल 500 कोटींचा सट्टा लावलाय. हवामान खात्याने याबाबतची माहिती दिलीये. 


येत्या 9 जूनला पाऊस झाल्यास सट्ट्याचा दर 65 पैसे इतका ठेवण्यात आलाय. त्यानंतर शुक्रवारी मान्सूनचे आगमन झाल्यास सट्ट्यावर 45 पैसे इतका दर आहे. 11 जूनसाठी सट्ट्याची रक्कम 50 पैसे तर 12 जूनला पाऊस येणार यासाठी सट्टयाचा दर 80 पैसे इतका ठेवण्यात आलाय.


मान्सून कधी येणार यावरच सट्टा लावण्यात आलेला नाही तर मान्सूनचे प्रमाण किती असेल यावरही सट्टा लावण्यात आलाय. 


मान्सूनचे प्रमाण अंदाजापेक्षा कमी पडेल यावर 70 पैसे दराप्रमाणे सट्टा लावण्यात आलाय तर अंदाजाइतका पाऊस होईल यावर 75 पैसे दराने सट्टा तर वर्तवलेल्या अंदाजापेक्षा जास्त पाऊस होईल यावर  60 पैसे दराने सट्टा लावण्यात आलाय.