स्टेट बँकेकडून घरांच्या व्याजदरामध्ये कपात
देशातली सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेनं परवडणाऱ्या घरांच्या व्याजदरामध्ये पाव टक्क्याची कपात केलीये. त्यामुळे आता पहिल्यांदा गृहकर्ज घेणाऱ्यांना केवळ 8.35 टक्के दरानं कर्ज मिळेल.
नवी दिल्ली : देशातली सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेनं परवडणाऱ्या घरांच्या व्याजदरामध्ये पाव टक्क्याची कपात केलीये. त्यामुळे आता पहिल्यांदा गृहकर्ज घेणाऱ्यांना केवळ 8.35 टक्के दरानं कर्ज मिळेल.
30 लाख रुपयांच्या आत कर्ज घेणारे परवडणाऱ्या घरांच्या गटात मोडतात. पुरूष कर्जदारांसाठी 31 जुलैपर्यंत 0.20 टक्क्यांची सवलत देण्यात आलीये. महिला कर्जदारांसाठी 0.25 टक्क्यांची सवलत देण्यात आलीये. या सवलतींमुळे महिन्याला 530 रुपये हप्ता कमी होईल, असं बँकेचे व्यवस्थापकीय संचालक रजनीश कुमार यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 2022पर्यंत प्रत्येकासाठी घराचं स्वप्न साकार करण्याच्या दिशेनं हे महत्त्वाचं पाऊल अशल्याचं कुमार म्हणाले.