स्कूलबस रेल्वेची टक्कर, ८ विद्यार्थी ठार
उत्तरप्रदेशातील भदोहीमध्ये एक मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर, स्कूल बस आणि रेल्वेची टक्कर झाली, यात सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, ही घटना माधोसिंह रेल्वेस्टेशनजवळ झाली.
लखनौ: उत्तरप्रदेशातील भदोहीमध्ये एक मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर, स्कूल बस आणि रेल्वेची टक्कर झाली, यात सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, ही घटना माधोसिंह रेल्वेस्टेशनजवळ झाली.
या अपघातात सात ते आठ विद्यार्थी गंभीर जखमी आहेत, जखमी मुलांना उपचारासाठी वाराणसीत दाखल करण्यात आले आहे. अपघात झाला तेव्हा १९ मुलं स्कूलबसमध्ये होते.
स्कूलबसचा ड्रायव्हर मोबाईल हेडफोनलावून स्कूलबस चालवत असल्याचं सांगितलं जातंय.
अपघातातील मुलं टेंडर हार्टस्कूलचे विद्यार्थी होते. ही गाडी मडुआडीह-अलाहाबाद पॅसेंजर ट्रेन वाराणसीहून अलाहाबादकडे जात होती, सकाळी आठ वाजता हा अपघात झाला.