दिल्ली : शिवसेनेने पाकिस्तानच्या राजदूताला २४ तासात परत पाठवण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. काश्‍मीरबद्दल चिथावणीखोर वक्तव्य करणारे पाकिस्तानचे राजदूत अब्दुल बसीत यांना २४ तासात पाकिस्तानमध्ये परत पाठवावे, अशी संतप्त मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले, 'जो व्यक्ती राजधानी दिल्लीत बसून देशाविरुद्ध विष ओकतो, अशा व्यक्तीला २४ तासात इस्लामाबादला परत पाठवायला हवे. तसेच त्यांचा दिल्लीसह मुंबईतील दूतावास बंद करायला हवा. स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस अगोदर ते असे वक्तव्य करतात. मला खात्री आहे की सरकार त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करेल. तसेच पाकिस्तान त्यांचा स्वातंत्र्यदिन का साजरा करतो हे मला कळत नाही, कारण पाकिस्तान एक देश नसून दहशतवाद्यांचे केंद्र आहे'.


पाकिस्तान आपला सत्तरावा स्वातंत्र्यदिन काश्‍मीरच्या स्वातंत्र्यासाठी समर्पित करत असल्याचे वक्तव्य बसीत यांनी केले आहे. या वक्तव्याच्या कॉंग्रेसनेही निषेध केला आहे.