मुंबई : भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या कारवाईच्या बातमीनंतर भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेन्सेक्समध्ये तब्बल 572.89 अंकाची घसरण होत तो 27,719.92 वर येऊन पोहोचला तर निफ्टीमध्ये 186.90च्या अंकाची घसरण होत तो 8,558.35 अंकावर येऊन स्थिरावला. 


भारतीय जवानांनी दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईची माहिती भारतीय लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आली. या बातमीनंतर शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली.