कारगिलमधल्या बर्फवृष्टीत साताऱ्याचे बागडे शहीद
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील धोंडेवाडी गावचे वीर जवान भागवत मुरलीधर बागडे यांचं कारगीलमध्ये निधन झालं.
सातारा : सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील धोंडेवाडी गावचे वीर जवान भागवत मुरलीधर बागडे यांचं कारगीलमध्ये निधन झालं.
कारगीलमध्ये कर्तव्य वजावत असताना ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे त्यांना जीव गमवावा लागलाय. भागवत बागडे हे 508 बटालियनमध्ये कार्यरत होते. कारगिलमध्ये गुरुवारी ते वाहनातून जात असताना अचानक बर्फवृष्टी झाल्याचे वृत्त आहे. त्यामध्ये भागवत सापडल्यानंतर त्यांना श्वास घेण्यास अडथळे निर्माण झाले. गुदमरलेल्या अवस्थेत ते बेशुद्ध झाले. सैन्य दलाच्या जवानांनी त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल केले. मात्र, रात्री भागवत यांना वीर मरण आल्याचे सैनिक अधिकार्यांकडून सांगण्यात आले.
ते केवळ ३६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुलं आणि मोठा भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचं वृत्त कळताच धोंडेवाडी गावावर शेककळा पसरलीय.