शरद पवार यांनी घेतली अरूण जेटलींची भेट
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी अरूण जेटली यांची संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात काल भेट घेतली.
नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी अरूण जेटली यांची संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात काल भेट घेतली.
जिल्हा बँकांवर लावण्यात आलेले निर्बंध उठवण्याची मागणी पवारांनी जेटलीकडे केली आहे. आरबीआयचे नियंत्रण असताना निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे निर्बंध उठवण्याची मागणी केली आहे.
यावर, विचार करून लवकरच योग्य तो निर्णय घेतले जाणार असल्याचे जेटलींनी पवारांना सांगितले.
यापूर्वी शरद पवार यांनी नोट बंदीच्या मोदींच्या निर्णयाचे स्वागत केले होते. पण शेतकऱ्यांची बहुतांशी रक्कम ही जिल्हा बँकेत असते, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या मागे पवारांचा उद्देश असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.