पवारांनी मांडला राज्यसभेत जिल्हा बँकांचा मुद्दा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यसभेत जिल्हा बँकांचा मुद्दा मांडला. जिल्हा बँकांकडं पुरेसे पैसे नाहीत, तसंच पीककर्ज देण्यासाठीदेखील पैसे उपलब्ध झाले नसल्याचा आरोप त्यांनी केलाय.
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यसभेत जिल्हा बँकांचा मुद्दा मांडला. जिल्हा बँकांकडं पुरेसे पैसे नाहीत, तसंच पीककर्ज देण्यासाठीदेखील पैसे उपलब्ध झाले नसल्याचा आरोप त्यांनी केलाय.
शेतक-यांचे हाल होत असून अरुण जेटली आणि मोदींनी यात लक्ष घालावं, असं आवाहन त्यांनी केलंय. जिल्हा बँकांकडं पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा आहेत. त्या रिझर्व्ह बँकेनं स्विकारलेल्या नाहीत. त्यामुळं ग्राहकांच्या त्या पैशावर व्याजदेखील द्यावं लागतंय. जिल्हा बँकांची या संकटातून सुटका करण्याचं आवाहन पवारांनी राज्यसभेत केलंय.