चेन्नईत दोन जहाजांच्या टक्करीमुळे तेलगळती, 24.06 किमीची किनारपट्टी प्रदूषित
चेन्नईच्या कामराजर बंदरानजीक दोन जहाजात टक्कर होऊन झालेल्या तेलगळतीनंतर तवंग हटवण्याचं काम सलग सहाव्या दिवशीही सुरु आहे.
चेन्नई : चेन्नईच्या कामराजर बंदरानजीक दोन जहाजात टक्कर होऊन झालेल्या तेलगळतीनंतर तवंग हटवण्याचं काम सलग सहाव्या दिवशीही सुरु आहे. जवळपास 700 कर्मचारी या कामात गुंतले असल्याची माहिती कोस्टगार्डकडून देण्यात आलीय.
या गळतीमुळे 24.06 किलोमीटर इतक्या लांबीची किनारपट्टी प्रदूषित झाली आहे. या तेलगळतीचा फटका समुद्रातील जैवविविधतेला बसला असून स्थानिक मच्छिमारांचा रोजगार बुडालाय. इथल्या समुद्राच्या पृष्ठभागावर तेलाचा तवंग पसरलाय.
नॅशनल सेंटर फॉर ओशियन इन्फर्मेशन सर्व्हिसने गुरुवारी सकाळपर्यंत 40 टन तेलाचा तवंग 27 टन तेल आणि पाण्याचे मिश्रण बंगलाच्या उपसागरातून काढण्यात आलाय.