राष्ट्रपतींच्या दुसऱ्या टर्मसाठी शिवसेनेचे प्रयत्न?
भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना दुसरी टर्म मिळण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरु असल्याचं दिसून येत आहे.
नवी दिल्ली : भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना दुसरी टर्म मिळण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरु असल्याचं दिसून येत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत.
प्रणव मुखर्जी हे भारताला लाभलेले सर्वोत्कृष्ट राष्ट्रपती असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. हे सांगतानाच शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजपला इशारा दिला आहे. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार भाजपनं एकतर्फी जाहीर करु नये. एनडीएतल्या घटकपक्षांशी चर्चा करून उमेदवार ठरवावा असंही राऊत म्हणालेत.
शिवसेना खासदार लवकरच प्रणव मुखर्जी यांची भेट घेणार आहेत. याआधी शिवसेनेनं प्रणव मुखर्जी आणि त्याआधी प्रतीभाताई पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा देऊन भाजपला शह दिला होता. राष्ट्रपती निवडणुकीआधी प्रणव मुखर्जी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेब ठाकरेंची भेटही घेतली होती.