कोईम्बतूर : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आपली तुटलेली चप्पल शिवणाऱ्या चर्मकाराला शंभर रुपये देऊ केले. १० रुपये मागूनही शंभर रुपये ठेवण्यास सांगितल्याने चप्पल शिवणाराही खुश झाला. स्मृती यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुटलेली चप्पल दुरुस्त करण्यासाठी इराणी गाडीतून उतरल्या. चर्मकाराला त्यांनी चप्पल दिली आणि त्या शेजारच्याच स्टुलावर बसल्या. चप्पल शिवण्याचे त्याने दहा रुपये मागितले. त्यावर इराणींनी शंभरची नोट त्याच्या हातावर ठेवत ‘सुट्टे पैसे देण्याची गरज नाही’ असं सांगितलं.


दहा रुपयांऐवजी शंभर रुपये मिळाल्याने चप्पल शिवणाराही खुश झाला. त्याने स्मृती यांच्या चपलेला आणखी टाके घातले.


केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी इशा फाऊंडेशनमध्ये भाषण देण्यासाठी कोईम्बतूरला गेल्या होत्या. विमानातून उतरल्यानंतर त्यांची चप्पल तुटली. त्यावेळी इराणींसोबत तामिळनाडू भाजपचे महासचिव व्ही श्रीनिवासनही होते.