नवी दिल्ली : अल्जाइमर, डायबिटीज आणि हाइपरटेंशन यासारख्या आजारांवरील औषधे महाग होणार आहे. या औषधांच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार आहे. सरकारकडून जवळपास अशा १०० औषधांना राष्ट्रीय यादीतून काढून टाकलं आहे.


सरकारच्या या निर्णयाचा ग्राहकांच्या खिशावर परिणाम होणार आहे. पण औषध उत्पादक कंपन्यांना फायदा होणार आहे. ड्रग्ज प्राईस रेग्युलेटरने मागचा निर्णय रद्द करत सरकारने कंपन्यांना औषधांच्या किंमती वाढवण्याची परवानगी दिली आहे. ही औषधं राष्ट्रीय सूचीमध्ये नसणार आहेत. याआधी देशात या औषधांच्या किंमतीवर नियंत्रण ठेवणाऱ्या नॅशनल फार्सास्युटिकल प्राइसिंग अॅथॉरिटीने अशा प्रकारच्या औषधांच्या किंमतींमध्ये एका वर्षात किंमती वाढवण्यास नकार दिला होता.