नवी दिल्ली : इटलीच्या ऑगस्टा वेस्टलँड कंपनीकडून व्हीव्हीआयपींसाठी खरेदी केलेल्या हेलिकॉप्टर प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह अन्य तीन जणांनी लाच घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, आज तातडीचे बैठक सोनिया गांधी यांनी त्यांच्या निवासस्थानी बोलावलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इटलीच्या ऑगस्टा वेस्टलँड कंपनीकडून हेलिकॉप्टर सौद्यात अडचणीत आलेल्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तातडीची बैठक बोलावलीये. मल्लिकार्जून खरगे, आनंद शर्मा यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते या बैठकीला उपस्थित आहेत.


हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणी इटलीमधल्या एका खटल्याच्या निकालामध्ये सोनियांसह माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, सोनियांचे सल्लागार अहमद पटेल, ऑस्कर फर्नांडिस यांची नावं आलीयेत. ऑगस्टा वेस्टलँड कंपनीकडून व्हीआयपींसाठी हेलिकॉप्टर खरेदीचा हा व्यवहार झाला होता. माजी हवाईदल प्रमुख एस.पी.त्यागी यांना सव्वाशे कोटी रुपयांची लाच दिल्याचा दावा यात करण्यात आलाय.


इटलीच्या कोर्ट ऑफ मिलाननं २२५ पानी निकालात हेलिकॉप्टर बनवणा-या फिनमेक्कानिका कंपनीच्या दोन अधिका-यांना लाच दिल्याच्या आरोपांवरुन दोषी ठरवलंय. आता मोदी सरकारनं या निकालाची माहिती इटलीतील भारतीय दूतावासाकडून मागवली आहे


.


या गैरव्यवहारात तर थेट सोनिया गांधी यांच्याकडेच संशयाची सुई वळल्याने भाजप खासदार संसदेत आक्रमक होणार असल्याचं चिन्हं आहेत. युपीए सरकारच्या काळात भारतानं २०१० मध्ये इटलीकडून १२ महागडी हेलिकॉप्टर विकत घेतली होती.. तब्बल ३ हजार ५६५ कोटी रुपयांच्या या व्यवहाराची बोलणी २००५-२००७7 या कालावधीत सुरु होती.