तिरुअनंतपुरम : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी यांच्याविरोधात केरळमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनिया गांधींसह केरळमधील काँग्रेस नेत्यांविरोधात एका कन्स्ट्रक्शन कंपनीने तिरुअनंतपुरममध्ये हा गुन्हा दाखल केलाय. त्यांच्यावर पैसे थकविल्याच्या आरोप करण्यात आलाय. याच कारणावरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.


हिथर कन्स्ट्रक्शन कंपनीचे मॅनेजिंग पार्टनर राजीव यांनी तक्रार दाखल केलेय. इमारतीच्या बांधकामाचे पैसे थकविल्याचा आरोप केलाय. राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज या इमारतीच्या बांधकामाचे कॉन्टॅक्ट हिथर कन्स्ट्रक्शन कंपनीकडे देण्यात आले होते. कंपनीने हे बांधकाम पूर्ण केले. मात्र, अद्याप या कंपनीला पैसे देण्यात आलेले नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे.


केरळचे माजी प्रदेशाध्यक्ष रमेश चेन्नीथला यांनी या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिले होते. दरम्यान, केरळ प्रदेश काँग्रेसकडून फंड नसल्याचे कारण देण्यात येत आहे. या कंपनीने यापूर्वी सोनिया गांधी यांना कायदेशीर नोटीसही पाठविली होती. पण, नोटीसला उत्तर न दिल्याने राजीव यांनी तक्रार दाखल केलेय. एफआयआरमध्ये सोनिया गांधींसह रमेश चेन्नीथला, केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चंडी आणि केरळचे प्रदेशाध्यक्ष व्ही. एम. सुधीरन यांची नावे आहेत.